शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:35 AM

कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून बंद असलेली महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. त्याचबरोबर कोरोनाचा ...

कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून बंद असलेली महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. त्याचबरोबर कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता याविषयी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. बुलडाणा जिल्ह्यात २८ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये सुरू करता येणार नसल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिवांना पाठविले आहे.

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आली होती. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने टप्प्याटप्प्याने सुरुवातीला ९ ते १२ व त्यानंतर ५ ते ८ च्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर महाविद्यालये सुरू करण्याविषयी चर्चा सुरू झाली होती. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सावंत यांनी १५ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली होती तसेच याविषयी निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. बुलडाणा जिल्ह्यामध्ये १ फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. तसेच कोविड-१९ या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये असलेल्या परिस्थितीचा विचार करता २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्वीप्रमाणेच सुरू असलेले ऑनलाईन वर्ग सुरू ठेवावे त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार करून महाविद्यालये प्रत्यक्ष उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे.

बॉक्स...........

कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच

बुलडाणा शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. १४ फेब्रुवारी रोजी ११० रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तसेच १५ फेब्रुवारी रोजी १२९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

९० महाविद्यालये

३५,००० विद्यार्थीसंख्या