कोरोना विरोधात लढण्यासाठी सकस आहार घेण्याबाबतचा सल्ला आ. गायकवाड यांनी त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांना केला होता. यासंदर्भाने मांसाहाराचा उल्लेखही त्यांनी केला होता. त्यासंदर्भातील वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमामध्ये आले होते. यासंदर्भाने हरिभक्त परायण प्रशांत महाराज दहीकर यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी काही आक्षेपार्ह विधान आ. संजय गायकवाड यांनी केले होते. यासंदर्भातील ऑडिअेा क्लीप या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यातून अनेक वारकऱ्यांनी आ. गायकवाड यांना फोन लावले होते.
दरम्यान, यासंदर्भात बोलताना हरिभक्त परायण दहीकर महाराज यांनी या प्रकरणात आता राजकारण घुसले आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी आता या राजकारणात न पडलेलेच बरे अशी भूमिका घेत या वादावर पडदा टाकला आहे. दुसरीकडे आ. गायकवाड यांनी आपण आपल्या मतावर ठाम आहोत. केंद्र सरकारच्या डायट प्लानमध्येही अनुषंगिक बाबीचा समावेश असल्याचे म्हटले आहे. सोबतच भाजपच्या वारकरी सेलकडून यासंदर्भातील ऑडिअेा क्लीप व्हायरल केल्या गेल्याचे म्हटले आहे.