बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र आहे़. नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात घटल्याने जिल्ह्यातील ९५ टक्क्यांपेक्षा जास्त बेड रिक्त आहेत़. दुसरीकडे जिल्ह्यात १०० पेक्षा कमी रुग्णांवर उपचार सुरू आहेत़.
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़. पहिल्याच्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेचे दुष्परिणाम माेठे हाेते़. शहरापुरताच मर्यादित असलेला काेराेना दुसऱ्या लाटेत गावखेड्यांपर्यंत जाऊन पाेहोचला हाेता़. त्यामुळे आराेग्य विभागाची पुरती दमछाक झाली़. रुग्णसंख्या वाढल्याने अनेकांना बेड मिळत नव्हते़. तसेच खेड्यांमध्येही मृतांची संख्या वाढली हाेती़. आराेग्य विभाग आणि प्रशासनाने केलेल्या प्रयत्नामुळे जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र आहे़. नव्याने आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा काेराेनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे दिलासादायक चित्र जिल्ह्यात आहे़.
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेदरम्यान ११३० सर्वसाधारण बेडची व्यवस्था करण्यात आली हाेती़. त्यापैकी केवळ ५ रुग्ण दाखल असल्याने ११२५ बेड रिक्त आहेत़ तसेच खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये ८०५ ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले हाेते़. साेमवारी केवळ ३१ रुग्ण दाखल असल्याने ७७४ बेड रिक्त हाेते़. व्हेंटिलेटर बेड १०५ असून, त्यापैकी ६० रुग्णच दाखल असल्याने ४५ बेड रिक्त आहेत़
आयसीयुत एकही रुग्ण दाखल नाही
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत अचानक रुग्ण वाढल्याने खासगी आणि शासकीय काेविड सेंटर हाउसफुल्ल झाली हाेती़. त्यामुळे, एप्रिल महिन्यात काेराेना रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळत नव्हते़. अनेकांना बेड न मिळाल्याने प्राण गमवावे लागले हाेते़. आता काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने आयसीयुत एकही रुग्ण दाखल झालेला नाही़. त्यामुळे, आयसीयुची ४७५ बेड रिक्त आहेत.
तिसऱ्या लाटेचा धाेका कायम
काही जिल्ह्यांमध्ये वाढत असलेले रुग्ण आणि तिसऱ्या लाटेचा धाेका तज्ज्ञांनी वर्तवल्याने राज्यभरात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहे़त; मात्र काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याने पुन्हा गर्दी वाढली आहे़. अनेक ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे़. तसेच स्थानिक प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष हाेत असल्याने तिसऱ्या लाटेचा धाेका निर्माण झाला आहे़
लसीकरणाची गती वाढवण्याची गरज
जिल्ह्यात लसीकरण संथ गतीने हाेत आहे़. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धाेका पाहता. लसीकरणाची गती वाढवण्याची गरज आहे़. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ दाेन्ही डाेसचे केवळ ३०़. ६८ टक्के लसीकरण झाले आहे़. दाेन्ही डाेस घेणाऱ्यांची संख्या केवळ ६़ ९३ टक्के आहे़. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धाेका पाहता, लसीकरणाची गती वाढवण्याची गरज आहे़.