लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : मास्कचे दर निश्चित करण्यासाठी गठित समितीने उत्पादक खर्चावर निश्चित नफा ठेवून विक्री किंमत ठरवली. त्याचवेळी औषध व्यावसायिकांनी आधीच खरेदी केल्याने त्यांना चढ्या दराने मास्कचा पुरवठा कंपन्यांनी केला. ते मास्क आता कमी किंमतीत विकण्याची वेळ आल्याने औषध व्यावसायिक अडचणीत आले आहेत. शासन निर्णयापूर्वीच्या साठ्याला हा निर्णय लागू करू नये, यासाठी महाराष्ट्र स्टेट केमिस्टस अँड ड्रगिस्ट असोसिएशनने शासनाकडे धाव घेतली आहे. त्यासाठी असोसिएशनने शासनाला पत्र दिले आहे. त्यामध्ये शासन परिपत्रकातील प्रस्तावित किंमतीपेक्षा फार मोठी किंमत देऊन व्यावसायिकांनी मास्क खरेदी केले आहेत. त्याचा साठा विक्रेत्यांकडे पडून आहे.
ब्रँडेड कंपन्यांची मास्क विक्री बिनबोभाटविशेष म्हणजे, बाजारात कापडी मास्कसह विविध प्रकारचे मास्क रस्त्यावर किंवा दुकानात कोठेही उपलब्ध आहेत.त्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांचे मास्कही आहेत. त्यांच्याकडे शासनाने कोणतेही लक्ष दिले नसल्याचेही असोसिएशनने पत्रात म्हटले आहे.