खामगाव: मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात खामगाव येथील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी दमानिया यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी माधव पाटील यांनी तक्रारीत केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया रा.सांताक्रुझ रोड मुंबई यांनी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे म् यांच्यावर खोटे व बिनबुडाचे केले. इतक्यावरच न थांबता त्यांची प्रतिमा मलीन करुन बदनाम करण्यासाठी तसेच त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये फसविण्याच्या उद्देशाने चोपडा अर्बन को-आॅप बँक लि.चोपडा या बँकेचे खोटे चेक अस्तित्वात आणले. हे चेक े खरे म्हणून सुध्दा न्यायालयात वापरले. त्यामुळे अंजली दमानिया यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. दरम्यान, एकनाथराव खडसे यांच्याप्रती समाजात अंजली दमानिया यांनी खोट्या गोष्टी जाणीवपूर्वक समाजामध्ये पसरविल्या. त्यामुळे खडसे यांना व त्यांच्या कुटुंबियांना शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. यामुळे बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे याबाबत अंजली दामानिया यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेही माधव पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. शहर पोलिसांनी पाटील यांची तक्रार दाखल करून घेतली आहे.