शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

उमेदवारांविरुद्ध मोबाईल अ‍ॅपवर करता येणार तक्रार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 2:51 PM

खामगाव :  आपल्या मतदारसंघात होत असलेल्या गुन्ह्याची, अफरातफरीची, नियमांचे उल्लंघन करण्याची माहिती निवडणूक आयोगाला प्राप्त व्हावी यासाठी आयोगाने मोबाईल अ‍ॅप लाँच केले आहे.

- योगेश फरपटलोकमत न्युज नेटवर्क खामगाव :  आपल्या मतदारसंघात होत असलेल्या गुन्ह्याची, अफरातफरीची, नियमांचे उल्लंघन करण्याची माहिती निवडणूक आयोगाला प्राप्त व्हावी यासाठी आयोगाने मोबाईल अ‍ॅप लाँच केले आहे. ‘सिव्हीआयजीआयएल’ असे अ‍ॅपचे नाव असून गुगल प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध आहे. या अ‍ॅपचा वापर करून आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्यात थेट तक्रार करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. निवडणूक काळात कुठेना कुठे आचारसंहितेचा भंग होतो. अनेक नागरिकांना त्याची माहिती असते. त्यांची तक्रार करायची इच््छा असूनही  तक्रार करण्याची प्रक्रिया किचकट असल्याने अनेकजण पुढे येत नसत. त्यामुळे संबधित गुन्हा हा दडपला जायचा. ही सर्व प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने मोबाईल अ‍ॅप लॉंच केले आहे. हे अ‍ॅप कुणीही गुगल प्लेस्टोरमधून  डाऊनलोड करू शकतो. ‘सिव्हीआयजीआयएल’ हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर या अ‍ॅपमध्ये  मोबाईल नंबरसह काही माहिती भरावी लागेल. त्यानंतर याची अधिकृत नोंदणी होईल. त्यात आवश्यक माहिती भरायची आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण आपल्या परिसरात होणाºया आदर्श आचारसंहितेच्या भंग चे फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकतो. या अ‍ॅपमधून सरळ फोनचा कॅमेरा ओपन करून व्हिडिओ रेकॉर्डही करू शकता किंवा फोटो क्लिक करून तो निवडणूक आयोगाला पाठवण्याची सोय या अ‍ॅपमध्ये आहे. या अ‍ॅपमधून निवडणूक आयोगाला लोकेशनची माहितीही देवू शकता येते. कोणत्या ठिकाणी उमेदवारांकडून नियमांचा भंग होत आहे हे सर्व रेकॉर्ड करता येवू शकते. पारदर्शक प्रक्रिया या अ‍ॅपमध्ये एक डिस्क्रिप्सन बॉक्स असून यात मतदार काही माहिती टाईप करू शकतात. यात किती जणांनी तक्रार केली? किती तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेतली? हे सर्व मतदारांना दिसू शकणार आहे. तक्रारकर्त्या व्यक्तीचे नाव गोपनिय राहणार असून नागरिकांनी आचारसंहिता भंग, नियमांचे उल्लंघन आदी संबधित गुन्हयांची माहिती अ‍ॅपद्वारे देवून सहकार्य करावे असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. 

 १०० मिनिटात तक्रारीचे निवारण निवडणूक आयोगाच्या ‘सिव्हीआयजीआयएल’या अ‍ॅपवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. प्रथम ती माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडे येईल. त्यानंतर ती संबधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे फॉरवर्ड केली जाईल. तक्रारीनंतर १०० मिनिटांच्या आत यावर संबधित क्षेत्राचे निवडणूक अधिकारी कारवाई करतील. त्यावर जिल्हा निवडणूक अधिकाºयांचे नियंत्रण असणार आहे. - गौरी सावंग, उप-जिल्हा निवडणूक अधिकारी, बुलडाणा.  खामगावात १३ पथके कार्यान्वीत खामगाव मतदारसंघात १३ पथके कार्यान्वीत करण्यात आली असून कुठेही आचारसंहितेचा भंग होत असेल तर नागरिक अ‍ॅपवर तक्रार नोंदवू शकतात. - शीतल रसाळ, तहसिलदार, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावlok sabhaलोकसभा