शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
3
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
4
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
5
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
6
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
7
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
8
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
9
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
10
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
11
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
12
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
14
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
15
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
16
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
17
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
18
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
19
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

जलयुक्त शिवार अभियानाची कामे मुदतीत पूर्ण करा!

By admin | Published: May 12, 2017 8:06 AM

जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या अधिका-यांना सूचना

बुलडाणा : राज्यभर जलयुक्त शिवार ही फलदायी योजना ठरली आहे. या योजनेचे दुरगामी परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. ही योजना लोकचळवळीच्या रुपामध्ये समोर येत आहे. या योजनेच्या अनुकूल परिणामांसाठी सर्व यंत्रणांनी व अधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम केले पाहिजे. या अभियानातील कामे विहीत कालावधीत पूर्ण करा, अशा सूचना राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी गुरुवारी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्ये जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, जि.प अध्यक्ष उमा तायडे, आमदार आकाश फुंडकर, डॉ. संजय रायमुलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षन्मुखराज, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदी उपस्थित होते.सन २०१६ - १७ मध्ये निवडलेल्या २४५ गावांतील कामे विनाविलंब पूर्ण करण्याचे आदेश देत शिंदे म्हणाले की, सन २०१५ - १६ व २०१६ - १७ मधील प्रस्तावित केलेली आणि प्रगतीपथावर असणारी कामे पूर्ण करावी. सर्व यंत्रणांनी जबाबदारी यशस्विरीत्या पार पाडावी. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविल्या जावू शकतो. त्याचे उदाहरणे जिल्ह्यात पाहायला मिळाली. भूजल संरक्षित करून सिंचन वाढविण्यासाठी ही योजना वरदान ठरली आहे. त्यामुळे स्वत:चे काम समजून जलयुक्तची कामे करावी. या अभियानामुळे जिल्ह्यात जल व मृदा संधारणाची मोठ्या प्रमाणावर कामे झाली. या कामांमुळे भूजल पातळीत दोन मीटरने वाढ नोंदविण्यात आली आहे, तसेच ४५ हजार २७० टीसीएम पाणीसाठा जिल्ह्यात निर्माण झाला आहे. या पाणीसाठ्यातून ३८ हजार १२१ हेक्टर क्षेत्रावर सिंचन निर्मिती करण्यात आलेली आहे. अभियानापूर्वी जिल्ह्यात ८० गावात टँकर सुरू होते. या अभियानात ही सर्व ८० टँकरग्रस्त गावे समाविष्ट करण्यात आली. या गावांची टँकरमुक्तीकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे, तसेच जिल्ह्यात लोकसहभागातून गाळ काढण्याची ५८ गावांमध्ये कामे सुरू आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही मोहीमही प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना राम शिंदे यांनी दिल्या.