जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाण्यासाठी अडचण निर्माण होत असून, त्याचे मुख्य कारण हे जीवन प्राधिकरण विभागातील रिक्त पदे हे आहे. या विभागात कर्मचारी वर्ग कमी असल्याने कामाचा अतिरिक्त बोजा कर्मचाऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाची गती संथ झाली आहे. बुलडाणा जीवन प्राधिकरण विभागांतर्गत येणाऱ्या बुलडाणा, चिखली, खामगाव, जळगाव जामोद येथे आकृतिबंधानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ८० पदे मंजूर आहेत. सध्या कार्यरत पदे केवळ १७ भरलेली असून, ६३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून, पाणीपुरवठ्याच्या योजना पूर्णत्वास जाण्यास अडचण निर्माण होत आहे. तेव्हा रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन खासदार प्रतापराव जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी त्यांच्यासोबत बुलडाणा शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत उपस्थित होते.
पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करा : जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:38 AM