वराेडी : महाराष्ट शासन कृषी विभागातर्फे वराेडी येथे शेतकऱ्यांसाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले हाेतेे. या कार्यशाळेतून विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. दिनांक २ फेब्रुवारी राेजी गावपातळीवर शेतकऱ्यांची सभा घेण्यात आली. यामध्ये शेतकरी, महिला बचतगट, शेतकरी गट यांना शेतीविषयक समस्या व उपाय याेजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच डाॅ. भुजंगराव गाराेळे हाेते. दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांच्या जागृतीसाठी प्रभातफेरी काढण्यात आली. सूक्ष्म नियाेजन समन्वयक रुपाली गावंडे यांनी विविध याेजनांविषयी माहिती दिली. तिसऱ्या दिवशी शिवारफेरी काढण्यात आली. यामध्ये नालाबंडीग, पाणी अडवा, पाणी जिरवा यांची पाहणी करण्यात आली. या कार्यशाळेत कृषी पर्यवेक्षक मदन शिंदे, गणेश बंगाळे, रुपाली गावंडे, श्रीकृष्ण पाचरणे, अनिल डाेइफाेडे, विजय गाेराळे आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी सरपंच डाॅ. गाराळे, सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी परिश्रम घेतले.
तीन दिवशीय कार्यशाळेचा समाराेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:30 AM