असोसिएशनमध्ये सेंट्रल पब्लिक स्कूल व राजश्री ग्लोबल स्कूलचे सचिव ऋषी जाधव, सत्यजीत इंटरनॅशनल स्कूलचे सचिव भुषण मिनासे, महेश विद्या मंदिरचे अध्यक्ष डॉ. सुभाष लोहिया, संताजी कॉन्व्हेटचे अध्यक्ष डॉ. गंगाधर क्षीरसागर व सचिव संतोष डोंबळे, राम पब्लिक स्कूलचे अध्यक्ष डॉ. राम शिंदे आदी असोसिएशनचे समन्वयक म्हणून कामकाज पाहणार आहेत. ऋषी जाधव यांनी सर्व संस्थाचालकांचे स्वागत करुन सभेचा विषय परिचय सर्वांसमोर मांडला. सहविचार सभेमध्ये काेविड १९ मुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान कसे भरुन काढता येईल, त्याकरिता आपले कोणते प्रयत्न असतील यावर सर्वांनी आपले मत मांडले. सहविचार सभेमध्ये डॉ. गजानन निकस, रविंद्र माळी, सरिता खंडेलवाल, ज्योती मंत्री, मनिषा राजबिंडे, अंभोरे, शेळके इत्यादी प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन शिक्षण देताना मागील वर्षात आलेल्या अडचणीवर आपले मत मांडले. त्यावर संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व दर्जेदार शिक्षणासाठी चांगल्या उपाययोजना सुचविल्या. तसेच सर्व प्राचार्यांनी बैठकीमध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन दिले. सभेचे संचालन सिद्धार्थ जाधव यांनी केले तर आभार डॉ. गजानन निकस यांनी केले. कार्यक्रमासाठी मनोहर म्ह्ळसणे, योगेश काळे, अमोल काकडे, विशाल वाघोळे, अनिल चिखलेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
इंग्रजी माध्यमांच्या संस्थाचालकांची सहविचार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:22 AM