लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जल जीवन मिशनची अंमलबजावणी राज्यातील गावांमध्ये प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. ही नळजोडणी घेणाऱ्या प्रत्येकाला ग्रामपंचायतीला द्याव्या लागणाºया अजार्सोबत आधार क्रमांक लिंक करावा लागणार आहे. त्यासाठी गावातील सेतू, सुविधा केंद्रांवर पुन्हा एकदा गर्दी होण्याची शक्यता आहे.केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योजनेच्या अंमलबजावणीसाठी बेसलाईन सर्वेक्षण करून पुढील ४ वर्षांचे नियोजन होणार आहे. त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला प्रती दिन दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठा करण्यासाठीचा कृती आराखडा तयार केला जात आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस, स्वयंपाकासाठी, घरगुती वापरासाठी शुद्ध पुरेसा आणि शाश्वत पाणी पुरवठा केला जाईल. प्रथक गाव कृती आराखडा, जिल्हा कृती आराखडा त्यानंतर राज्याचा कृती आराखडा तयार होईल. त्यामध्ये त्रैमासिक तसेच वार्षिक नियोजनाचा समावेश असेल. ज्या गावांमध्ये आधीच योजना आहेत, तसेच स्टॅण्डपोस्टपर्यंतच पाणी पोहचले तेथून नळाद्वारे घरात पाणी दिले जाणार आहे. ज्या गावांमध्ये योजना नाहीत, तेथे स्वतंत्र योजनांना मंजूरी मिळणार आहे. पाण्याचे प्रमाण कमी असलेल्या गावांचा समावेश प्रादेशिक योजनेत होईल. स्वतंत्र योजनेसाठी १८ तर प्रादेशिक योजना ३६ महिन्यांत पूर्ण करावी लागले.
नळजोडणीसाठीही आधार लिंकिंगची अट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 11:57 AM