शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

लोणारमध्ये इको सेन्सेटिव्ह झोनबाबत संभ्रम; विकास कामे रखडली

By निलेश जोशी | Published: August 30, 2023 7:15 PM

सरोवरालगतच्या १०० मीटर परिसरात उल्कापातामुळे झालेल्या या सरोवरातील मलबा अर्थात इजेक्टा ब्लँकेट पसरलेले आहे.

लोणार : उल्कापातातून निर्माण झालेल्या लोणार सरोवराभोवती आजही काही प्रमाणात तत्कालीन अवशेष असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरोवरालगतचा काही अंतरापर्यंतचा परिसर हा अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. परंतु सरोवरापासून नेमके किती अंतर हे अतिसंवेदनशील क्षेत्र आहे, याचा उलगडा होत नसल्याने या इको सेन्सेटिव्ह झोनबाबत स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यातून येथील विकासकामे रखडल्याची अेारड होत आहे.

स्थानिक नागरिक, पालिका प्रशासन, वन्यजीव, पर्यटन विभाग, महसूल विभागामध्येही याबाबत संभ्रम आहे. परिणामस्वरूप विकास आराखड्यातील प्रस्तावीत विकाकामे मार्गी लावण्याबाबत प्रशासकीय यंत्रणांमध्येच द्विधा मनस्थिती आहे. त्यामुळे निधी असूनही कामे रखडल्याचे वास्तव आहे.

सरोवरालगतचा १०० मीटर परिसर अतिसंवेदनशीलसरोवरालगतच्या १०० मीटर परिसरात उल्कापातामुळे झालेल्या या सरोवरातील मलबा अर्थात इजेक्टा ब्लँकेट पसरलेले आहे. संशोधनाच्या दृष्टीने हा परिसर महत्त्वपूर्ण असल्याने सरोवराच्या सभोवती ३६० डिग्रीमधील १०० मीटरचा परिसर पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, नुसार अतिसंवेदनशील क्षेत्र (इको सेन्सेटिव्ह झोन) म्हणून घोषित करण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घेतलेला आहे. मात्र हे करत असताना याची परिसीमा अजूनही निश्चित नसल्याची माहिती आहे. त्यातून गोंधळ उडत आहे. अनुषंंगिक सीमा निश्चित केल्यास संभ्रम दूर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केल्या जात आहे. सरोवरालगतचे ३८३.२२ हेक्टर क्षेत्र वन्यजीव विभागाने अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. तशी अधिसूचना २० नोव्हेंबर २०१५ रोजी काढण्यात आली होती. त्यामुळे या भागात खोदकाम, नवीन बांधकाम, वृक्षतोड, ध्वनीप्रदूषण करण्यासह प्लास्टिकवर बंदी आहे.

ही कामे पडली आहेत बंदजुन्या तहसील इमारतीच्या ठिकाणी पर्यटन स्वागत केंद्र, धारतीर्थ ते सरदार वल्लभ पटेल हायस्कूल पर्यंतच्या रस्त्याचे काम, पालिकेच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण ही कामे सध्या प्रामुख्याने रखडलेली आहेत. त्यामुळे येथील अतिसंवेदनशील क्षेत्राच्या सीमेसंदर्भातील संभ्रम इको सेंसेटिव्ह झोन समितीच्या अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकारी दूर करतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.