इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:11 AM2018-02-13T01:11:02+5:302018-02-13T01:12:03+5:30
बुलडाणा : गेल्या तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अत्यंत कमी झाल्या असतानासुद्धा शासनाने नफेखोरीसाठी पेट्रोल, डीझल, गॅस सिलिंडर इंधनाचे भाव कमी केलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता वेठीस धरल्या जात आहे. त्यामुळे जनमानसात शासनाविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झालेला असल्याने भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आज शहर कॉंग्रेस व तालुका कॉंग्रेसच्यावतीने आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात इंधन दरवाढीच्या विरोधात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क

या बैलगाडी मोर्चामध्ये बुलडाणा शहर व तालुक्यातून मोठय़ा संख्येने लोक उपस्थित होते. आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सदर मोर्चा पुढे संगम चौक- जयस्तंभ चौक- बाजार लाइन- जनता चौक कारंजा चौक- स्टेट बँक चौकातून तहसील कार्यालयावर पोहोचला. मोर्चात ५0 हून अधिक बैलगाड्या सामिल झाल्या होत्या. प्रत्येक बैलगाडीवर बॅनर, कॉंग्रेस पक्षाचे झेंडे, छोटे फलक तथा केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत स्वयंस्फूर्तीने असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मोर्चाला सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त दाद देत आपला पाठिंबा दर्शविला.
दरम्यान मोर्चा तहसील कार्यालय बुलडाणा येथे येऊन आ. हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते मुख्त्यारसिंग राजपूत, तालुकाध्यक्ष सुनील तायडे, रसुल खान, दत्ता काकस, नंदकिशोर शिंदे, रिजवान सौदागर, कौतिकराव पाटील, पुरूषोत्तम देवकर यांनी सुरेश बगळे तहसीलदार बुलडाणा यांना निवेदन दिले. याप्रसंगी महेंद्र बोर्डे, शेषराव पाटील, अमोल तायडे, उषाताई चाटे, चांद मुजावर, प्रभाकर वाघ, अभय मोरे, भागवत वानेरे, विजू काळवाघे, रमेश काळवाघे, अनिल खाकरे-पाटील, अँड. गणेशसिंग राजपूत, उखा चव्हाण, महेंद्र गवई, जाकीर कुरेशी, युनूस खा सहाब, बबलु मावतवाल, आसिफ, अफसर सरवर, अमिन टेलर, अँड. राज शेख, तारीक नदीम, अन्वर शेख, इरफान कुरेशी, आरिफ खान, निजाम शेख हनिफ शेख, सखाराम पाटील, जुनेद खान, विजय कड, जावेद खान, रवींद्र भाकरे, बाळु जगताप, गणेश पाटील, नागेश उबरहंडे, शालीक्राम पाटील, राजू सुसर, अंकुशराव पाटील, सुधाकर पाटील, अशोकराव सावळे, तेजराव सावळे, किशोर चांडक, साहेबराव चव्हाण, रणिजित झाल्टे, अभिमन्यू जाधव, गजानन भुसारी, बबनराव पाटील, भारत भिसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.