लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: मागासवर्गीय व अदिवासी कल्याणासाठी देण्यात आलेला निधी गत आठ महिन्यांपासून अखर्चित असल्याने आदिवासी व मागासवर्गीय लाभार्थींना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करीत शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध म्हणून काँग्रेसच्यावतीने स्थानिक तहसील कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले.जिल्हा नियोजन समितीच्या नियोजन सभेत जिल्हय़ात राबविण्यात येणार्या विविध कल्याणकारी योजनेसाठी मागासवर्गीय व अदिवासींसाठी नियतव्यय सन २0१७-१८ साठी मंजूर असतानाही गत ८ महिने मागासवर्गीय योजनांसाठी एक रुपयाही निधी वितरित न करून मागासवर्गीय कल्याण योजनेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या गेले आहे. तर निधी जिल्हा नियोजन कार्यालयाकडून वितरित न झाल्याने या योजनेवरचा आजवरचा खर्च शून्य टक्के आहे.. अदिवासी विभागासाठी मंजूर निय तव्ययाच्या प्रमाणात अतिशय अल्प निधी वितरित करण्यात आलेला असून, जेमतेम ४.३२ टक्के एवढाच निधी आजवर खर्च झाला आहे; मात्र याच नियोजन विभागातून सर्वसाधारणसाठी जवळपास ३३ टक्के निधी खर्च केला असल्याने संबंधित विभागाकडून मागासवर्गीय व आदिवासी यांच्याकडे हेतुपुरस्सर अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करी त जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाभरात ‘ढोल बजाओ’ आंदोलन आले. याअंतर्गत ४ सप्टेंबर रोजी चिखली काँग्रेसच्यावतीने दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करून शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध करण्यात आला व तहसीलदार मनीष गायकवाड यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अ तहरोद्दीन काझी, बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, संजय पांढरे, समाधान सुपेकर, ज्ञानेश्वर सुरूषे, रफिक कुरेशी, डॉ.. इसरार, नगरसेवक अ. रऊफ, दीपक थोरात, राजू रज्जाक, सुनील कासारे, विजय गाडेकर, सचिन बोंद्रे, किशोर कदम, बिदुसिंग इंगळे, ईश्वर इंगळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
मागासवर्गीय, आदिवासी समाज विकासापासून वंचित - उमाळकरमेहकर: काँग्रेसच्या राजवटीत शेतकरी, गोरगरीब जनता, शेतमजूर आदिवासी समाजबांधव, मागासवर्गीय समाजबांधव यांच्यासाठी विविध योजना सुरू केल्या होत्या. काँग्रेसने विविध योजनांवर निधी उपलब्ध करून मागासवर्गीय समाज, आदिवासी समाजबांधव यांच्या विकासासाठी सतत प्रयत्न केले होते. त्याच योजना भाजप सरकार पुढे चालवित आहे; परंतु निधीअभावी अथवा निधी असूनही व आदिवासी समाजबांधवांना विकासापासून वंचित ठेवले जात आहेत. त्यामुळे या सरकारचा काँग्रेसच्यावतीने आम्ही निषेध करतो, असे काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी सांगितले. भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी मेहकर तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.