लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोणतीही पूर्वसूचना न देता वीज वितरण कंपनीने भारनियमन सुरू केले आहे. याबाबत शासनाने कोणतेही ठोस पावले उचललेली नाहीत. अशा शासनाच्या जनविरोधी कार्यपद्धतीच्या निषेधार्थ बुलडाणा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे १८ सप्टेंबर रोजी येथील तहसील कार्यालयावर कंदील मोर्चा काढण्यात आला.तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, नाकर्ती शासन व्यवस्था, चुकीची निर्णय क्षमता आदीमुळे जनतेच्या त्रासात दिवसेंदिवस अधिक वाढ होत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता विद्युत मंडळाने भारनियमन सुरू केले असल्यामुळे जनता अधिकच त्रस्त झाल्याचे विदारक चित्र जिल्हाभर दिसून येत आहे. शासनाच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ बुलडाणा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे येथील तहसील कार्यालयावर तालुकाध्यक्ष सुनील तायडे यांच्या नेतृत्वाखाली कंदील मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मीनल आंबेकर, दीपक रिंढे, रिजवान सौदागर, दत्ता काकस, कौतिकराव पाटील, अँड. बाबासाहेब भोंडे, डॉ. पुरुषोत्तम देवकर, राजीव काटीकर, रसूल खान, चाँद मुजावर, अमोल तायडे, विनोद बेंडवाल, प्रमिला जाधव, दलितमित्र शेषराव सावळे, तेजराव सावळे, तुळशीराम डोंगरे, अंकुश सावळे, सुधाकर पाटील, ोकानंद डांगे पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
काँंग्रेसचा कंदील मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:49 PM
बुलडाणा : कोणतीही पूर्वसूचना न देता वीज वितरण कंपनीने भारनियमन सुरू केले आहे. याबाबत शासनाने कोणतेही ठोस पावले उचललेली नाहीत. अशा शासनाच्या जनविरोधी कार्यपद्धतीच्या निषेधार्थ बुलडाणा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे १८ सप्टेंबर रोजी येथील तहसील कार्यालयावर कंदील मोर्चा काढण्यात आला.
ठळक मुद्देभारनियमनाच्या विरोधात शासनाच्या कार्यपद्धतीचा निषेधशासनाच्या जनविरोधी कार्यपद्धतीच्या निषेध