चालक-वाहकांना पुष्पगूच्छ देऊन भाडेवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:33 PM2018-06-16T18:33:16+5:302018-06-16T18:33:16+5:30

डोणगाव : येथील बसथांब्यावर एसटी बसचालक व वाहकांना १६ जून रोजी काँग्रेसच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन एसटी बसच्या भाडेवाढीचा निषेध करण्यात आला.

congress protest bus fair hike in dongaon | चालक-वाहकांना पुष्पगूच्छ देऊन भाडेवाढीचा निषेध

चालक-वाहकांना पुष्पगूच्छ देऊन भाडेवाढीचा निषेध

Next
ठळक मुद्देभाववाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने एसटी बसचालक व वाहकांना पुष्पगुच्छ देऊन भाडेवाढीचा निषेध करण्यात आला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या चालक व वाहकास गुलाबपुष्प दिले.


डोणगाव : येथील बसथांब्यावर एसटी बसचालक व वाहकांना १६ जून रोजी काँग्रेसच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन एसटी बसच्या भाडेवाढीचा निषेध करण्यात आला.
     अच्छे दिनच्या नावाखाली केंद्रात व महाराष्ट्रात भाजप सरकारने चालविलेली डिझेल व पेट्रोल किंमत वाढ व त्यामुळे जीवनावश्यक वस्तुचे व एसटी भाड्यात शासनाने केलेली भाडेवाढ ही सर्वसामान्यावर एक प्रकारचा अर्थिक हल्ला असून यामुळे सर्वसामान्य जनतेचे व बळीराजाचे आर्थिक गणीत कोलमडले आहे. त्यामुळे डोणगाव बसथांब्यावर शासनाच्या भाववाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने एसटी बसचालक व वाहकांना पुष्पगुच्छ देऊन भाडेवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी डोणगाव काँग्रेसचे उपसरपंच जुबेरखान, तालुका काँग्रेसचे सचिव अबरार खान, जावेदखान, युवक काँग्रेसचे जेनुल अबेद्दीन, शेख राजू, वसीम बागवान, हमीद बागवान, प्रकाश जावळे यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या चालक व वाहकास गुलाबपुष्प दिले. यावेळी अबरार खान यांनी एस.टी. भाडेवाढ करून शासनाने सर्वसामान्याच्या वाहतूक व्यवस्थेचे गणित बिघडविले असल्याचे मत व्यक्त केले.

Web Title: congress protest bus fair hike in dongaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.