नांदुरा येथे शेतकर्‍यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसने व्यक्त केला निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:41 AM2017-12-18T00:41:31+5:302017-12-18T00:42:30+5:30

बुलडाणा : स्थानिक गांधी भवनसमोरील संगम चैकात व स्टेट बँक चौकात नांदुरा येथे शे तकर्‍यांवरील हल्ल्याचा काँग्रेसने १७ डिसेंबर रोजी निषेध व्यक्त केला.

Congress protested against attacks on farmers in Nandura | नांदुरा येथे शेतकर्‍यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसने व्यक्त केला निषेध 

नांदुरा येथे शेतकर्‍यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसने व्यक्त केला निषेध 

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या नांदुरा दौर्‍याप्रसंगी निदर्शने दडपण्यासाठी शेतकर्‍यांना मारहाणशासनाला जाब विचारणार्‍या शेतकर्‍यांची ही मुस्कटदाबी

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : स्थानिक गांधी भवनसमोरील संगम चैकात व स्टेट बँक चौकात नांदुरा येथे शे तकर्‍यांवरील हल्ल्याचा काँग्रेसने १७ डिसेंबर रोजी निषेध व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या नांदुरा दौर्‍याप्रसंगी शेतकर्‍यांनी शेती मालाला हमीभाव व फसवी कर्जमाफी  या मागणीसाठी लक्ष वेधून निर्दशने केली असता त्यांची निदर्शने दडपण्यासाठी लोकप्र ितनिधी व काही भाजप कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांना बेदम मारहाण करून त्यांना रोखण्यात  आले.  यावेळी उपस्थित पोलिसांनी बघ्याची भूमिका घेत कोणताच हस्तक्षेप केला नाही.   शासनाला जाब विचारणार्‍या शेतकर्‍यांची ही मुस्कटदाबी असून, या कृतीचा तीव्र निषेध  जिल्हाध्यक्ष आ. राहुल बोंद्रे व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आमदार हर्षवर्धन   सपकाळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी नोंदविला.  यावेळी माजी आमदार बाबूराव पाटील, लक्ष्मणराव घुमरे, मुख्त्यारसिंग राजपूत, डॉ.  अरविंद कोलते, रामविजय बुरुंगले, प्रसेनजित पाटील, हाजी रशीदखा जमादार, अँड.  हरीश रावळ, मनोज कायंदे, संजय पांढरे, अशोक पडघान, विष्णू पाटील, सुनील तायडे,  राजेंद्र वानखेडे, देवानंद पवार, अनिल खाकरे, रसूल खान, कलिम खान, शरद राखोंडे,  अतरोद्यीन काझी, शिवदास रिंढे, रिजवान सौदागर, अशोक हिंगणे आदी पदाधिकारी,  कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Congress protested against attacks on farmers in Nandura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.