लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सत्ताधार्यांच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच स्व. धर्माजी पाटील यांच्यासह अन्य शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासोबतच आस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकर्याला गारपिटीची भरीव मदत देण्यात यावी. त्यासाठी सत्ताधार्यांना सद्बुद्धी मिळावी यासाठी बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. राहूल बोंद्रे यांच्यासह काँग्रेसच्या ३0 नेत्यांनी शनिवारी स्थानिक जयस्तंभ चौकात एकदिवसी उपवास व मौनव्रत धारण केले होते.अखील भारतीय काँग्रेसचे सचिव आ. हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्याम उमाळकर सरचिटणीस संजय राठोड, माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, रामविजय बुरुंगुले यांनी या मौनव्रत आंदोलनात पूर्णवेळ सहभाग घेतला. यासोबतच सतिष मेहेंद्रे, हरीश रावळ, कासम गवळी, शैलेश सावजी, ज्योती ढोकणे, संगीता पांढारे, वा. रा. पिसे, मनोहर बोराखडे, गफार सर, दीपक देशमाने, अंबादास बाठे, प्रकाश चव्हाण, अशोक हिंगणे, रामभाऊ जाधव, अब्दुल रऊफ, राजेंद्र वानखेडे, सुनील तायडे, मंगला पाटील, सुनीता देशमुख, रामदास मोरे, अमोल तायडे, चंद्रपालसिंग परिहार, गजानन परिहार या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेला महात्मा गांधीच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले आणि उपवास आणि मौनव्रत सुरू करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात आले असताना शेतकर्यांच्या समस्या व अडचणीची त्यांच्या समोर मांडण्यासाठी जिल्हा काँग्रेसने वेळ मागितली असता त्यांनी वेळ दिला नाही. दोन दिवसांपूर्वी जिल्हयात गारपिट व अवकाळीने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झालेले असतांनाही शेतकर्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचा निषेध करण्यासाठीही काँग्रेसच्यावतीने हे मौनव्रत व उपवास आंदोलन केले. गांधी भवनासमोर आयोजित या आंदोलनात माजी जि.प. अध्यक्ष प्रकाष पाटील, चित्रांगण खंडारे, प्रसेनजीत पाटील, पदम पाटील, संतोश टाले, माजी सभापती दिलीप जाधव, जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई शेळके, हाजी रषिद खाँ जमादार, विजयसिंग राजपूत, साहेबराव बोरे, मनोज कायंदे, महेंद्र गवई, सुभाषसिंग राजपूत, सुधाकर धमक, बाबासाहेब भोंडे, रमेश घोलप प्रामुख्याने उपस्थित होते.भाजपने उत्पादन खर्चावर आधआरीत ५0 टक्के नफा देण्याचे, दोन काटेी रोजगार देण्याचे, शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे, गरीबांना हक्काची घरे देण्याची आश्वासने दिली होती. सत्तेवर येऊन तीन वर्षांचा कार्यकाळ लोटला तरी अद्याप एकही आश्वासन या सरकारने पूर्ण केलेले नाही, असाही आरोप काँग्रेसने या आंदोलनाच्या पृष्ठभूमीवर केला आहे. या आंदोलनात विष्णू पाटील, कुलसुंदर, संजय पांढरे, डॉ. सत्येंद्र भुसारी, सचिन शिंगणे, डॉ. मोहम्मद इसरार, ज्ञानेश्वर सुरोशे, भगवान धांडे, रसुल खान, संजय बाहेकर, सुनील तायडे, अशोक हिंगणे, राजेंद्र वानखेडे, अनिल खाकरे, राजु पाटील, सुनील सपकाळ यांच्यासह अन्य सहभआगी झाले होते.
९९ तासानंतरही सर्व्हे अपूर्णजिल्ह्यातील ११ तालुक्यात गारपिटीमुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ४८ तासांत सर्व्हेक्षण पूर्ण करू असे सांगणार्यांनी ९९ तास उलटले तरी सर्व्हेक्षण पूर्ण नाही. राज्यात १२00 कोटी रुपयांचे नुकसान गारपीटीमुळे झाले आहे. मात्र मदत २00 कोटी रुपयांची जाहीर केली आहे. ही शेतकर्यांची थट्टा असल्याचे जिल्हा काँग्रेसचे म्हणणे आहे. सोबतच अधिकार्यांच्या माध्यमातून नुकसान २0 ते ३0 टक्केच दाखविण्याच्या सुचनाही तलाठय़ांना दिल्या गेल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे सरकार फक्त उद्योगपती, व्यापारी व भांडवलदारांचे असल्याचाही काँग्रेसचा आरोप आहे. कृषी महोत्सवासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांकडून गारपीटग्रस्तांना भरघोस मदतीची अपेक्षा होती. पण मुख्यमंत्री आले आणि तसेच निघून गेले.