लोणार (जि. बुलडाणा): : लोणार नगरपालीकेच्या निवडणुकीनंतर पाहिल्यांदाच स्थायी समितीची निवडणूक १५ एप्रिलला झाली. यामध्ये कॉग्रेसचे वर्चस्व असल्याचे चित्र निर्माण झाले. लोणार नगर पालिकेतील १७ पैकी १३ नगरसेवक काँग्रेसचे निवडून आल्याने नगर पालीकेत काँग्रेसची बहुमतात सत्ता आली. निवडणुकीनंतर पाहिल्यांदाच नगर पालीकेच्या विषय समित्यांची निवडणूक १५ एप्रिल रोजी झाली. त्यात शिक्षण समिती सभापतीपदी उपाध्यक्ष शे.समद, महिला बालकल्याण सफीयाबी बेगम नुरमहंमद खॉ, आरोग्य सभापती सौ.सिमा नितीन शिंदे, बांधकाम सभापती न.प.तील काँग्रेसचे गटनेते शांतीलाल गुगलीया, नियोजन सभापती सौ.लता पंढरी चाटे, पाणीपुरवठा सभापती सौ.वंदना अरुण जावळे यांची अविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रभारी तहसिलदार मदन जाधव, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी महेश वाघमोडे यांनी कामकाज पाहिले. या बैठकीला नगराध्यक्षा सौ.रंजना राजेश मापारी, माजी बांधकाम सभापती सुदन कांबळे, महिला बालकल्याण सभापती सौ.योगिता पाटोळे, भुषण मापारी, शे.गफ्फार शेठ, शे.असलम शे.कासम, सौ.शैला गोपाल तोष्णीवाल, सौ.सुशिला बाबुसिंग जाधव, खानासेठ, सौ.संगिता गोविंद मापारी, प्रा.गजानन खरात, अंबादास इंगळे, शे.उबेद शे.मुनाफ आदी उपस्थित होते. या निवडीनंतर नवनिर्वाचित सभापतींनी नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नरत राहू, अशी ग्वाही दिली. यावेळी अनेकांनी नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत केले. *लोणारमध्ये 'महिलाराज'स्थानिक स्वराज संस्थेत महिलांना ५0 टक्के आरक्षण मिळाल्याने लोणार नगर पालीकेत १७ पैकी ९ महिला सदस्या निवडून आल्या. नगराध्यक्षपदी सौ.रंजना राजेश मापारी यांच्या रुपाने महिलेला संधी मिळाली. तसेच आज पार पडलेल्या विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीतही ६ पैकी ४ समित्यांवर महिलांची सभापतीपदी निवड झाल्याने लोणार नगर पालीकेवर खर्या अर्थाने महिला राज यामुळे आले आहे.
स्थायी समित्यांवर काँग्रेसचे वर्चस्व
By admin | Published: April 16, 2015 12:38 AM