शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

काँग्रेसचा गड ढासळला!

By admin | Published: February 24, 2017 2:17 AM

बुलडाणा जिल्हा परिषदेत भाजपा सर्वात मोठा पक्ष

बुलडाणा, दि. २३- जिल्हा परिषदेच्या ५५ वर्षांच्या कार्यकाळात प्रथमच भाजपा सर्वाधिक २४ जागांवर मुसंडी मारून सर्वात मोठा पक्ष म्हणून नावारूपास आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या १0 जागा मिळून जिल्हा परिषदेवर भाजपा-शिवसेना युतीचा झेंडा फडकविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सत्ता टिकवून ठेवण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आल्यामुळे नेत्यांवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागात मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद ग्रामीण भागातील विकासाची वाहिनी म्हणून ओळखली जाते. ६0 सदस्य संख्या असलेल्या बुलडाणा जिल्हा परिषदेवर जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून ५५ वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता राहिलेली आहे. मात्र, यावेळी जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भाजपाने नेत्रदीपक यश मिळवून २४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून नावारूपास आला आहे. शिवसेनेने १0 जागा जिंकून लक्षवेधी यश मिळविले आहे. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादीला मोठय़ा प्रमाणात पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसला १४, तर राष्ट्रवादीला आठ जागांवर विजय मिळवून समाधान मानावे लागले. याशिवाय भारिपने व अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळविला आहे. स्वाभिमानी पक्षाला खातेही उघडता आले नाही.बुलडाणा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटासाठी ४१ उमेदवारांमध्ये सामना रंगला होता. यासाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान होऊन २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट गटातून राष्ट्रवादीचे डी.एस. लहाने यांनी काँग्रेसचे कौतिकराव जाधव यांचा पराभव केला. मासरूळ गटातून शिवसेनेचे कमल बुधवत यांनी काँग्रेसच्या शकुंतला लांडे यांचा पराभव केला, तर सावळा-सुंदरखेड गटातून सविता बाहेकर यांनी भारिपचे सुरेश सिनकर यांचा पराभव केला. साखळी बु. गटातून काँग्रेसच्या जयश्री शेळके यांनी भाजपाच्या सुरेश चौधरी यांचा, तर धाड गटातून काँग्रेसच्या सौदागर हिना महम्मद रिजवान यांनी राष्ट्रवादीच्या मंगलाताई भोंडे यांचा पराभव केला. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीने प्रतिष्ठा केली होती. मात्र त्यांना यश आले नाही. तर रायपूर गटामध्ये काँग्रेसच्या साधना जाधव यांनी भाजपाच्या नंदा तरमळे यांचा पराभव करून विजय मिळविला.याशिवाय घाटाखालील तालुक्यात अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यात मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी या सर्कलमध्ये खा.प्रतापराव जाधव यांचे चिरंजीव ऋषी जाधव यांचा भाजपाचे संजय वडतकर यांनी पराभव केला. डोणगाव जि.प. सर्कलमध्ये माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांचे चिरंजीव शैलेश सावजी यांचा शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र पळसकर यांनी पराभव केला. लोणार तालुक्यातील किनगाव जट्ट जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू गुलाब इंगळे यांनी भाजपचे अभय चव्हाण यांचा पराभव केला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगावमही जि.प. सर्कलमध्ये राष्ट्रवादीचे रियाजखान पठाण विजयी झाले. त्यांनी भाजपाचे भगवान मुंडे व काँग्रेसचे प्रदीप नागरे यांचा पराभव केला. सावखेड भोई जि.प. सर्कलमध्ये काँग्रेसचे देवानंद कायंदे यांनी राष्ट्रवादीचे डॉ. रामप्रसाद रंगनाथ शेळके यांचा पराभव केला