बुलडाणा : राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी व बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साेमवारी धरणे आंदाेलन करण्यात आले़. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्टपतींना देण्यात आले़निवेदना म्हटले आहे की, केंद्र सरकार द्वारे शेतकरी कायदे २०२० अंमलात आले असून त्या कायद्यांविरोधात दिल्ली येथे शेतकरी मागील सहा महिन्यांपासून आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने लादलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तिव्र संताप असून या कायद्याविरोधात शेतकरी एकवटला आहे. केंद्र सरकारचे हे शेतकरी कायदे अन्यायकारक असून या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील २०० दिवसांपेक्षा जास्त दिवस ठाण मांडून बसले आहे. या आंदोलन काळात आतापर्यंत ३५० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहे. मोदी सरकारने सुरवातीला चर्चेचा देखावा केला, पण कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मान्य केली नाही. शेतकरी कृषी कायदे पारित करतांना संसदेमधे कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. केंद्र शासनाचे हे शेतकरी अन्यायकारक कायदे रद्द करावेत व शेतकरी बांधवांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे निवेदनात म्हटले आहे़. निवेदनावर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे, किसान काँग्रेसचे अध्यक्ष बालगजानन उर्फ राजू पाटील, माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, विजय अंभोरे, मनिषा पवार, ज्योती पडघान, स्वाती वाकेकर, काँग्रेस नेते रामविजय बुरंगले , लक्ष्मणराव घुमरे, अॅड जयश्री शेळके, सतिश महेंद्रे, दत्ता काकस, सुनिल सपकाळ , समाधान सुपेकर, गणेश पाटील, कलीम खान, अमेय देशमुख, अविनाश उमरकर, अर्जुन घोलप, डाॅ भुसारी, निलेश अंजनकर, डाॅ इसरार जमादार, वसीम कुरेशी, दिपक सलामपुरीया, नाना देशमुख, दिलीप जाधव, देवानंद पवार आदींसह इतरांची स्वाक्षरी आहे़.
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काॅंगेसचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 7:22 PM