शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

 शिक्षण आणि ‘करिअर’  दोन वेगवेगळ्या गोष्टी - निशीगंधा बावधनकर-तायडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 19:51 IST

प्रसिध्द सौदर्यं विशेषज्ञ निशीगंधा बावधनकर- तायडे यांच्याी साधलेला संवाद... 

-अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव:  प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक वळणं येतात.  मात्र, हीच वळणं मनुष्याला अधिक प्रगल्भ आणि समृध्द करतात. प्रत्येक संघर्षाशी सामना करत, जीवनाला सामोरं गेलं तरच जीवन सफल होते. प्रसिध्द सौदर्यं विशेषज्ञ निशीगंधा बावधनकर- तायडे यांच्याी साधलेला संवाद... 

 शिक्षण आणि कारकीर्द या बद्दल काय सांगाल? जिद्द, सचोटी आणि परिश्रमाच्या जोरावर एखादी निरक्षर अथवा कमी शिक्षलेली व्यक्ती आयुष्यात यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. अनेक व्यक्ती आयुष्यात येणारे अनुभव आणि प्रवासातून बरंच काही शिकून जातात. त्यामुळे शिक्षणाचा आणि कारकीर्दीचा फारसा संबध आहे, असे मानने चुकीचे ठरेल? असे आपले प्रामाणिक मत आहे. 

वकीली क्षेत्र सोडण्या मागचे कारण काय?   शिक्षणानंतर पुणे येथे वकीलीची कारकीर्द सुरू केली. मात्र, वकीलीपेक्षा सौदर्य आणि कलाक्षेत्रातच सुरूवातीपासून आपणाला आवड होती. त्यामुळे वकीलीचे शिक्षण घेतले असले तरी, आवडीच्या क्षेत्रात कारकीर्द करण्याचे ठरविले. रूची म्हणून सौदर्य क्षेत्रात उतरले. रूची हीच  आपल्या सौदर्य क्षेत्रातील कारकीर्दीला महत्वाचे वळण ठरली.  वकीली क्षेत्रात मनापासून मेहनत घेतली असती तर कदाचित या क्षेत्रातही नावलौकीक मिळविता आला असता. मात्र, नियतीला काही औरच मान्य होतं.

सौंदर्यक्षेत्रात आपली उपलब्धी काय?सौंदर्यक्षेत्राला ‘करिअर’ म्हणून निवडल्यानंतर जय मल्हार मालिकेतील नायिका इशा केसकर यांचे मेकअप करण्याची संधी मिळाली. त्यानंतर चित्रपट, नाट्य आणि टिव्ही मालिका क्षेत्रातील नवोदीत तसेच इतर नवोदीत कलावंताच्या सौदर्याची काळजी घेण्याचे भाग्य लाभले.

प्रत्येकाच्या मनात सौदर्य दडलेलं असतं. सौदर्य हे त्वचेच्या पलीकडे असते. तरी पण आपली त्वचा आपले सौदर्य अभिव्यक्त करते. साधी केशरचना जरी चांगली नसली तरी अनेक जण दु:खी  होतात. त्यांच्या चेहºयावर हास्य फुलविण्यासाठी, सौंदर्य खुलविण्यासाठी आपले सौंदर्याच्या क्षेत्राला प्राधान्य राहणार आहे.

सौदर्य क्षेत्राकडं कशा वळलात ?वकीलीच्या दुनियेत पाऊल ठेवले आणि सौंदर्य चिकीत्सेच्या दुनियेत येऊन लोकांना सुंदर करण्याच्या कलेत प्राविण्य मिळविले. आता या क्षेत्रातच आपणाला मनस्वी आनंद मिळत आहे. दुसºयांच्या सौदर्याची काळजी घेणं ही एक कला म्हणून समोर येत आहे. या क्षेत्रातही युवकांना करीअर करण्याची संधी आहे. पारिवारीक सदस्य, नातेवाईक तसेच मैत्रिणींचे ‘मेकअप’ करून देत असतानाच, सौंदर्य विषयक कला अंगी असल्याचे समजले. त्यानंतर वकीलीक्षेत्राचा त्याग करून सौंदर्यक्षेत्राला महत्व दिले. या क्षेत्रात चांगली संधी मिळत आहे. युवकांनीही या क्षेत्राकडे वळावे, असे आपलं आवाहन आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत