शाळांच्या निर्जंतुकीकरणासाठी ग्रामपंचायतचा आधार
बुलडाणा: शाळांचे वेतनेतर अनुदानही रखडले आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी पैसे कोठून, असा प्रश्न या शाळांसमोर निर्माण झाला आहे. दरम्यान, या उपाययोजनांचा खर्च ग्रामपंचायतींच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांनी करावा, त्यासाठी १५ व्या वित्त आयोगामधून खर्च करण्यास मुभा दिली आहे.
एसटी बसेसला प्रवाशांची प्रतीक्षा
बुलडाणा: खासगी वाहनांच्या प्रवासी संख्येत वाढ होत असल्याने ट्रॅव्हल्सची संख्या आता वाढली आहे; परंतु एसटी बसेसला अद्यापही पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. एसटी बसेसला प्रवाशांची प्रतीक्षा लागलेली आहे.
व्हॉल्व्ह लिकेजमुळे पाण्याचा अपव्यय सुरूच
हिवरा आश्रम : ग्रामीण भागात पाणी पुरवठा नळांना तोट्या नसल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. कित्येक ठिकाणी पाण्याचे व्हॉल्व्हही लिकेज आहेत. पाणी पुरवठ्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत.
अंतर्गत रस्त्यावरून जड वाहतूक
लोणार: शहरातील अंतर्गत रस्ते अतिशय अरूंद असतानाही दिवसा शहरातील अंतर्गत रस्त्यावरून जड वाहतूक होत आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यावर वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होते. धार रोडवरही दुकानांसमोर वाहने लावली जातात, त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोग्य केंद्रामध्ये सुविधांचा अभाव
सुलतानपूर: लोणार तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. याचा नाहक त्रास रुग्णांना सोसावा लागत आहे. आरोग्य विभागाने याकडे लक्ष देऊन आरोग्य केंद्रामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.