मलकापूर (जि. बुलडाणा) : भरधाव कंटेनरने एका प्रवासी वाहनाला चिरडल्याने १३ जण ठार तर दोघे जण जखमी झाले. ही दुर्देवी घटना सोमवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील धरणगाव वळणावर नजीक घडली. या घटनेत मलकापूर तालुक्यातील अनुराबाद येथील सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या गावावर शोककळा पसरली आहे.एम.एच.४६- एम.क्यू.७९२५ ही गाडी सुमारे १५ प्रवासी घेवून अनुराबाद कडे निघाली होती. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील धरणगाव वळणावर विरूध्द दिशेने येत असलेल्या एम.एच.४०-बी.जी-९११३ या क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने प्रवासी गाडीस चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, या घटनेत प्रवासी वाहनाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अपघातानंतर तब्बल १ तासाच्या प्रयत्नानंतर ही गाडी कंटेनरखालून बाहेर काढण्यात यश आले. यात छगन शिवटकर आणि गोकुळ शिवटकर रा. बुरहाणपूर यांना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले. त्यांना रूग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्यांचीही प्राणज्योत मालवली. त्यामुळे मृतकांच्या संख्या १३ वर पोहोचली. तर वनिता प्रभाकर इंगळे (४०) रा. बहापुरा आणि गोकुळ भालचंद्र बेलोकार (३०) रा. बुरहाणपूर हे दोघे जखमी झाले आहेत. या अपघातामुळे तब्बल दीड तासापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कंटेनरमध्ये बारूद असल्याने या कंटेनरखालून अपघातग्रस्त प्रवासी वाहन काढताना पोलिस आणि मदतकार्य करणाºयांना चांगलीच दमछाक करावी लागली.
कंटेनरने प्रवासी वाहनाला चिरडले; १३ जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 17:04 IST
मलकापूर (जि. बुलडाणा) : भरधाव कंटेनरने एका प्रवासी वाहनास चिरडल्याने झालेल्या अपघातात १३ जण ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
कंटेनरने प्रवासी वाहनाला चिरडले; १३ जण ठार
ठळक मुद्देएम.एच.४६- एम.क्यू.७९२५ ही गाडी सुमारे १५ प्रवासी घेवून अनुराबाद कडे निघाली होती. धरणगाव वळणावर विरूध्द दिशेने येत असलेल्या एम.एच.४०-बी.जी-९११३ या क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने प्रवासी गाडीस चिरडले. अपघातानंतर तब्बल १ तासाच्या प्रयत्नानंतर ही गाडी कंटेनरखालून बाहेर काढण्यात यश आले.