लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जीवनावश्यक आणि मेडीकल दुकानावरील गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून खामगाव नगर पालिका प्रशासनाच्यावतीने संबंधीत दुकानाच्या समोर चुन्याचे बॉक्स आखले आहेत. एका बॉक्समध्ये एकाच व्यक्तीला उभे राहून वस्तू तसेच औषध खरेदी करावे लागणार आहे. यामुळे संबंधित दुकानासमोरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी मदत होत आहे.कोरोना या विषाणू आजाराचे संक्रमन थांबविण्यासाठी घरीच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. गर्दी टाळण्यासाठी राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. मात्र, तरीही जीवनावश्यक आणि वैद्यकीय साहित्याच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी दिसून येते. ही गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून चुन्याचे बॉक्स आखल्या जाताहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू आणि मेडीकलवरील गर्दी नियत्रंणात आणण्यासाठी मदत होत आहे.अनेक दुकानांसमोर चुन्याचे बॉक्स!शहरातील जीवनावश्यक वस्तूंची विविध दुकाने आणि मेडीकल समोर चुन्याचे बॉक्स आखण्यात आलेत. अग्रसेन चौक, टॉवर चौक, महावीर चौक, एकबोटे चौक, टिळक चौकातील दुकानांसमोर चुन्याचे बॉक्स तयार करण्यात आले आहेत. भाजी विक्रेत्यांच्यासमोरही चुन्याचे बॉक्स आखण्यात आले आहेत.
खामगाव शहरात चुन्याचे रकाने आखून गर्दीवर नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 15:06 IST