बुलडाणा : स्थानिक सहकार विद्या मंदिरमधील विद्यार्थ्यांच्यावतीने बुलडाणा शहरात ८० ठिकाणी शुक्रवारी व शनिवारी बुलडाणा अर्बनच्या अध्यक्षा कोमल झंवर यांच्या नेतृत्वात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमधये वर्ग १ ते १० वी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत बुलडाणेकरांना स्वच्छतेसाठी आवाहन केले. आपले बुलडाणा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जबाबदारी ही आपली असून, त्यासाठी आपण जागरुक असणे आवश्यक असल्याचे मत विद्यार्थ्यांनी बुलडाणेकरांसमोर मांडले. सदर मोहिम स्टेट बोर्डचे विद्यार्थी राबविणार आहेत. सर्वात आनंददायक बाब म्हणजे या विद्यार्थ्यांसोबत पालकदेखील सहभागी होत आहेत. बुलडाणा शहर स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत.केवळ बुलडाणा शहरच नव्हे तर चिखली शहरात देखील १४ आॅक्टोबर रोजी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासोबतच दिवाळी ही सर्वांची आनंदात साजरी होणे ही मनोकामना ठेवून विद्यार्थ्यांना कपडे, लहान मुलांचे ड्रेस, खेळणी दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर साहित्य शाळेत जमा केले. ‘माणुसकीची भिंत’ या सामाजिक कार्याच्या ठिकाणी हे साहित्य उपजिल्हाधिकारी ललितकुमार वºहाडे, कोमलताई झंवर, प्राचार्य अलागार सामी, जनसंपर्क अधिकारी विक्रांत सराफ यांच्या उपस्थितीत दान करण्यात आले. याप्रसंगी ग्रंथपाल नरेंद्र लांजेवार, छत्रछाया फाऊंडेशनचे अजय दराखे, मिलिंद चिंचोळकर, प्रमोद टाले, सुरेश कावळे, योगेश सुरडकर, पंकज राठोड, चेतनांकुरचे महेंद्र सौभागे यांच्यासह रणजितसिंग राजपूत, गावंडे, नितीन शिरसाठ, जितेंद्र कायस्थ, पप्पु राऊत, नितीन कोटकर, सहकार विद्यालयाचे मुख्याध्यापिका मोहिनी ससे, अरुण पवार यांच्यासह विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते. पुढील पाच दिवस विविध साहित्य गोरगरीब जनतेसाठी त्याठिकाणी देण्यात येणार आहे. तसेच विविध आश्रमशाळेत देखील सदर साहित्य भेट म्हणून देण्यात येणार आहे. तसेच चिखली शहरात देखील सदर साहित्य भेट म्हणून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या या दोन्ही सर्जनशील उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी या सामािजक कार्यातून खºया अर्थाने दिवाळी साजरी केली आहे.(प्रतिनिधी)
सहकाराने सजली माणुसकीची भिंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 1:27 PM