बुलडाणा/खामगाव: जळका भडंग येथे आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे खामगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. २४ मे रोजी रात्री साडेदहा वाजता एक आणि त्यानंतर मध्यरात्री सात असे एकूण आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जळका भडंग गावातील कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या ही आता नऊ वर पोहोचली आहे.पुणे येथे कोरोना संसर्गाचा वाढता उद्रेक पाहता तेथे राहणारा एक युवक जळका भडंग येथे स्वगृही परतला होता. २० मे रोजी तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या २३ जणांना क्वारंटीन करून खामगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आठ जणांचे हे अहवाल पॉझेटिव्ह आले आहेत. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात आता ग्रामिण •ाागात कोरोनाने शिररकाव केला असून त्याची गं•ाीरता आता वाढली आहे. प्रामुख्याने दहा मे नंतर जिल्ह्यात स्वगृही आलेले स्थलांतरी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर येऊ लागले होते. आतापर्यंत दहा स्थलांतरीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले असून यामध्ये जळका भडंग येथील युवकाचाही समावेश आहे.जळका भडंग येथील कोरोेना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीचा चुलत •ााऊ, त्याच्या कुटुंबातील चार जण व अन्य जवळचे तीन नातेवाईक असे एकूण आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान काही संदिग्ध रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहे.
जळका भडंग मध्ये प्रतिबंधीत क्षेत्रात २,५९५ नागरिकजळका भडंग येथे प्रतिबंधीत क्षेत्रात दोन हजार ५९५ नागिरक राहत असून येथील घर संख्या ५३७ आहे. ऐवढ्या छोट्याशा गावात तब्बल नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे आता परिसरात समूह संक्रमणाचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान गावात २० मे रोजीच प्रतिबंधीत पहिला कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचे घर केंद्रबिंदू मानून तयार करण्यात आले आहे. सध्या गावातील नऊ ही कोरोना बाधीत रुग्ण हे खामगाव येथील आयसोलेशन कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
दोन दिवसापूर्वी सदी, तापाचे पाच रुग्णजळगा •ाडंग येथे एकूण ११ पथकाद्वारे आरोग्य विषयक तपासणी करण्यात येत असून अनुषंगिक सर्व्हेक्षणही करण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी गावातील पाच जणांना सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे आढळून आली होती. सर्वेक्षणात ही बाब समोर आली होती. दरम्यान गावातील ६० व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रासलेल्या आहेत. कोरोना संसर्ग गावात झाल्याच्या पार्श्व•ाूमीवर गावातील ४९ जणांनी आरोग्य सेतू अॅपचा वापर करणेही सुरू केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.