लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनामुळे जिल्ह्यात बुधवारी ७ जणांचा मृत्यू झाला असून ४९१ जण तपासणीत कोरोना बाधीत आढळून आले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ५ हजार ९४३ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ५ हजार ४५२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील १०५, खामगाव ६२, शेगाव १६, देऊळगाव राजा ४३, चिखली ४५, मेहकर ३४, मलकापूर ७, नांदुरा १८, लोणार १६, मोताळा ३९, जळगाव जामोद ४६, सि. राजा ४६ आणि संग्रामपूर तालुक्यातील १४ जणांचा यात समावेश आहे.रुग्णालयात उपचारादरम्यान खामगावातील गोपाळनगर मधील ३७ वर्षीय व्यक्ती, पिंप्राळायेथील २९ वर्षीय व्यक्ती, मेहकरमधील आरेगाव येथील ६३ वर्षीय पुरुष, चिखलीमधील सातगाव भुसारी येथील ५० वर्षीय व्यक्ती, नांदुऱ्यातील ४० वर्षीय व्यक्ती शेगावातील ४९ वर्षीय महिला आणि बुलडाणा तालुक्यातील ८४ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे ५०४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान बाधित रूग्णांचे प्रमाण आता घटले असून सक्रीय रूग्णांची संख्याही साडेचार हजाराच्या घरात आली आहे.
Corna Cases in Buldhana : आणखी ७ जणांचा मृत्यू; ४९१ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 11:06 AM