लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तालुक्यात कोरोना लसीकरणाचा दर अत्यंत अल्प असून, दोन लाख २९ हजार लोकसंख्येच्या तालुक्यात आतापर्यंत केवळ २० हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले. हे प्रमाण केवळ १० टक्के असून, खेदाचे आहे. त्यामुळे येत्या काळात लस उपलब्ध झाल्याबरोबर सर्व ग्रामस्थांचे लसीकरण करावे, असे निर्देश खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी सोमवारी दिले. खामगाव पंचायत समितीअंतर्गत कोरोना महामारीबाबत आढावा बैठक सोमवारी आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आमदार फुंडकर यांनी तालुक्यातील गावांमध्ये कोरोना रुग्णांचे विलगीकरण करण्यासाठी शाळांमध्ये विलगीकरण केंद्र करण्यात यावे, त्याप्रमाणे प्रत्येक गावात कोरोनामुक्ती अभियान राबविण्यात यावे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ग्रामीण भागात होम आयसोलेशन ऐवजी गावांतील शाळांमध्ये विलगीकरण केंद्रात ठेवावे, त्यामुळे त्यांच्या घरातील वृद्ध व्यक्ती व लहान मुलांना कोरोना होणार नाही.
Corna Vaccination : खामगाव तालुक्यात १० टक्केच लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 11:45 AM