दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा पाच, खामगाव १३, पारखेड एक, गोंधनापूर एक, चिखली आठ, वळती दोन, मंगरूळ एक, गोद्री पाच, खंडाळा एक, चंदनपूर एक, ईसोली एक, देऊळगाव राजा तीन, बोराखेडी एक, टाकली एक, पिंपळगाव देवी दोन, जळगाव जामोद दोन, सावखेड तेजन तीन, वडाळी दोन, सावळी एक , खिरोडा दोन, टुनकी एक, गव्हाण एक, जवळपा दोन, शेगाव दोन, मलकापूर चार व अन्य एक याप्रमाणे ६९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत, तर १७ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये खामगाव कोविड सेंटरमधून सात, चिखली एक, बुलडाणा एक, शेगाव दोन, नांदुरा एक, देऊळगाव राजा दोन, जळगाव जामोद दोन आणि मलकापूरमधील एकाचा समावेश आहे. दुसरीकडे आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ९१ हजार ३३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर बाधित रुग्णांपैकी १२ हजार २३२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
८७८ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा
रविवारी (दि. ३) रोजी तपासण्यात आलेल्या ८७८ संदिग्धांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार ६७९ झाली असून, यापैकी २९५ सक्रिय रुग्ण आहेत. १५२ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.