पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये नांदुरा एक, खामगाव सहा, बुलडाणा सहा, लोणार एक, हत्ता एक, चिखली चार, सवडत एक, देऊळगाव राजा तीन, मेहकर १, शेगाव ६ , गायगाव एक, सांगवा एक, सारोळापीर एक आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील डोंगरगाव येथील एका बाधिताचा समावेश आहे. दुसरीकडे ३७ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये देऊळगाव राजातील आठ, खामगावमधील नऊ, बुलडाणा १५, चिखली एक आणि शेगावमधील चार जणांचा समावेश आहे. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्यांपैकी १ लाख १३ हजार ०८६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. यासोबतच १३ हजार ८९१ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांनाही आतापर्यंत रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
१७६ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा
अद्यापही १७६ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा असून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या सध्या १४,४११ झाली आहे. त्यापैकी १३ हजार ८९१ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून सध्या ३४७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.