पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये देऊळगाव राजा दोन, सोनोशी एक, खामगाव ९, वळती एक, बुलडाणा ९, चंदनपूर एक, चांधई एक, चिखली चार, येळगाव एक, पोखरी एक, सुरा एक, धोत्रा एक, शेगाव पाच, जानोरी एक, आळसणा एक, सिं. राजा एक, जळगाव जामोद तीन, पिंपळगाव देवी एक, मोताळा येथील तीन जणांचा समावेश आहे. यासोबतच ५८ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये देऊळगाव राजा कोविड केअर सेंटरमधील चार, जळगाव जामोदमधील तीन, शेगावमधील पाच, बुलडाणा २०, मोताळा १०, सिं. राजा एक, खामगाव सात, चिखली ४, मेहकर एक आणि मलकापूरमधील दोघांचा समावेश आहे.
९३,५१७ जणांचे अहवाल निगेटिव्ह
आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ९३ हजार ५१७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर १२ हजार ४४० बाधितांनी कोरोनावर मात केली. ७२० संदिग्धांच्या अहवालांची प्रतीक्षा असून, जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १२ हजार ९१४ झाली आहे. त्यापैकी ३१७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १५७ जणांचा आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.