लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जिल्ह्यात कोराना संदिग्धांच्या चाचण्या करण्याचा वेग वाढविण्यात आला असून वर्तमान स्थितीत दररोज १२०० च्या आसपास चाचण्या करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्ण वाढण्याचे प्रमाणही आता वाढत असून २२ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात ९९ जण कोरोना बाधीत आधळून आले तर १६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.गुरूवारी तपासणी करण्यात आलेल्या ७५३ जणांपैकी ६५४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ९९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये बुलडाणा २२, दुधा एक, येळगाव एक, मोताळा दोन, बोराखेडी एक, खामगाव दोन, निमकवला तीन, पिंपळगाव राजा एक, देऊळगाव राजा दोन, पाडळी शिंदे एक, मेहुणा राजा एक, चिखली १६, येवता एक, बोरगाव काकडे दोन, मेहकर आठ, डोणगाव तीन, हिवरा आश्रम दोन, मोळा एक, जानेफळ तीन, देऊळगाव माळी दोन, आरेगाव एक, कळंबेश्वर दोन, लोणार, एक, सुलतानपूर तीन, रूम्हणा दोन, चांगेफळ एक, मलकापूर पाच, शेगाव तीन, वरूड गव्हाण एक, नांदुरा दोन, बावनबीर एक आणि अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील चांगलवाडी येथील एकाचा यात समावेश आहे.दरम्यान १६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर आजपर्यंत ३८ हजार ६३७ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तसेच ८०५० बाधीतांनी आतापर्यंत कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ८,७९४ असून ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या ६२७ आहे. सध्या १२११ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा असून जिल्ह्यात ६२७ बाधितांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११७ जणंचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असली, तरी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.
बुलडाणा जिल्ह्यात ९९ पॉझिटिव्ह, १६ जणांना रुग्णालयातून सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 3:22 PM