शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

कोरोनानंतर बदलले घराघरातले किचन; हेल्दी पदार्थ वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:24 AM

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोनानंतर जवळपास सर्वच घरांतील स्वयंपाकघरात बदल झाला आहे. खाण्या-पिण्यात हेल्दी पदार्थांचा वापर करण्याकडे ओढा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : कोरोनानंतर जवळपास सर्वच घरांतील स्वयंपाकघरात बदल झाला आहे. खाण्या-पिण्यात हेल्दी पदार्थांचा वापर करण्याकडे ओढा वाढला आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या पालेभाज्या, फळांचा वापर वाढला आहे.

गेल्या वर्षभरात कधी नव्हते तेवढे इम्युनिटीचे महत्त्व जगाला पटले आहे. लोकांना आता कळून चुकले आहे की, केवळ कोरोनाच नाही तर कोणत्याही आजारापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे. यामुळेच सध्या लोकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर सुरू केले आहे. आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडेंट्स मिळतील असेच पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत.

कच्च्या भाज्या, कडधान्ये...

कोरोनाच्या काळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या पदार्थांचा वापर वाढला आहे. किचनमधील पदार्थही बदलले आहेत. सध्या आहारात ताज्या फळांचा समावेश जास्त प्रमाणात होत आहे.

यासह आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडेंट्स मिळतील, अशा आहाराचा समावेश वाढत आहे. कच्च्या भाज्या, कडधान्यांचा समावेश करण्यात येत आहे.

बाजारातून विकत आणलेल्या पालेभाज्या, फळे पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्याकडे लक्ष दिले जात आहे. यामध्ये किचनमध्ये व्हेजिटेबल क्लिनरचा वापर वाढला आहे. भाजीपाला धुवूनच घेतला जात आहे.

उन्हाळ्यात आंबा, सफरचंद, केळी आणि बीट हे तर खाण्याकडे नागरिकांचा ओढा वाढला. दररोज फळांचा आहारात वापर होत आहे. मोसमी फळांना जास्त पसंती दिली जात आहे.

प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी रोजच्या जेवणात हे हवेच

कोरोनाच्या काळात हिरव्या भाज्या, रताळे, शेंगदाणे, मका, बाजरी यांचा आहारात उपयोग करावा. राजमामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. राजमाची भाजी नक्की खावी.

दूध हे बऱ्याच पोषक तत्त्वांचे भांडार आहे. दुधात आढळणारे कार्ब, प्रथिने आणि चरबी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, म्हणून प्रत्येकाने दूध पिण्यावर भर द्यावा.

फळांमध्ये ए, बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्त्वे असतात. याशिवायही शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने फळे खायला पाहिजेत.

फास्ट फूडवर अघोषित बंदी

एकीकडे याकडे लक्ष देताना लोकांकडून दुसऱ्या गोष्टीकडे अघोषित बंदी आणली आहे, ती गोष्ट म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारे पदार्थ होय. कोरोनाच्या धास्तीने फास्ट फूड पदार्थ टाळण्यात येत आहेत. पाणीपुरी, कचोरी, भेळ, समोसा यांसारखे पदार्थ बाहेरून आणणे टाळत आहेत.

गृहिणी म्हणतात...

कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहे की, आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असली पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हेल्दी आहाराचा किचनमध्ये वापर वाढविला आहे. कुटुंबाची काळजी महत्त्वाची आहे.

- प्रियंका क्षीरसागर

सध्या सुट्टी असल्याने मुले सारखा हट्ट करतात. रोज काय करावे, असा प्रश्‍न पडतो; पण मुलांसाठी काहीतरी नवीन करावेच लागते. पालेभाज्यांचे थालीपीठ तसे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे पदार्थ बनवून देत आहे.

- जया शेळके

घरात मुलांची नेहमीच फर्माईश असते. दररोज काहीतरी चांगले पाहिजे, असा हट्ट असतोच. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण करताना वेळ जातोच. कडधान्याच्या नवीन उसळीचे प्रकार, पुलाव करत आहे.

- शीतल टाकसाळ