दुसरीकडे एकट्या बुलडाणा तालुक्यात १४६, खामगाव तालुक्यात १५३, मेहकर तालुक्यात १०३, नांदुरा तालुक्यात १०४, मलकापूर तालुक्यात ९३, शेगावमध्ये ६६, देऊळगाव राजातही ६६, चिखली ४४, लोणार ३२, मोताळा ३४, जळगाव जामोद ६, सिंदखेड राजा ५५, संग्रामपूर १ याप्रमाणे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
--यापूर्वीचा उच्चांक ८८५--
यापूर्वी १८ मार्च रोजी जिल्ह्यात सर्वाधिक ८८५ जण कोरोनाबाधित निघाले होते तर याच दिवशी तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २३ मार्चला ८६१, २४ मार्चला ८५५, ६ मार्च रोजी ८३७, २२ मार्च रोजी ५०६ आणि २१ मार्च रोजी ८०२ जण तपासणीमध्ये कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे मार्च महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने वारंवार उच्चांकी आकडा गाठला आहे. परिणामस्वरूप कोरोनाची दुसरी लाट ही सध्या जिल्ह्यात महत्तम पातळीवर पोहोचली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.