लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी १३ जणांचा मृत्यू झाला असून, ६१४ जण तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट कीटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४,२११ जणांचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. त्यापैकी ३,५९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील १०९, खामगाव ५७, शेगाव पाच, देऊळगाव राजा ११८, चिखली १२, मेहकर १९, मलकापूर १५, नांदुरा ४७, लोणार २०, मोताळा २५, जळगाव जामोद ७३, सिंदखेड राजा ७१ आणि संग्रामपूर तालुक्यातील ५२ जणांचा यामध्ये समावेश आहे. दुसरीकडे उपचारादरम्यान बुलडाणा तालुक्यातील तांदुळवाडी येथील ७८ वर्षीय व्यक्ती, खामगाव तालुक्यातील पळशी येथील येथील ५५ वर्षीय व्यक्ती, शेगावातील धनगरनगरमधील ४६ वर्षीय व्यक्ती, मध्यप्रदेशातील इंदूर येथील ४९ वर्षीय व्यक्ती, खामगाव शहरातील ४७ वर्षीय व्यक्ती, अकोल्यातील टाबकी रोड येथील ६५ वर्षीय व्यक्ती, खामगावातील सुटाळा येथील ६२ वर्षीय व्यक्ती, मोताळा तालुक्यातील जयपूर येथील ६५ वर्षीय व्यक्ती, नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील ८० वर्षीय व्यक्ती, लांजुड येथील ३८ वर्षीय व्यक्ती, लोखंडा येथील ५५ वर्षीय महिला, बोरी अडगाव येथील ६५ वर्षीय व्यक्ती आणि जळगाव जामोद तालुक्यातील सुलज येथील ६० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
Corona Cases in Buldhana : १३ जणांचा मृत्यू, ६१४ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 11:46 AM