बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र आहे़. साेमवारी ४१ जणांनी काेराेनावर मात केली असून १८ जणांचा अहवाल पाझिटीव्ह आला आहे़ १००१ कोरोना अहवाल 'निगेटिव्ह' आले आहेत़. तसेच स्त्री रूग्णालय बुलडाणा येथे पेनटाकळी ता. मेहकर येथील ९० वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. पाॅझिटीव्ह रुग्णांमध्ये संग्रामपूर तालुका ०१, खामगांव शहर ०१, खामगांव तालुका ०२, मेहकर तालुका :०१, जळगांव जामोद तालुका ०३, बुलडाणा शहर ०४, लोणार शहर ०१, मलकापूर शहर ०१, दे. राजा शहर ०१, दे. राजा तालुका ०१, नांदुरा तालुका दादगाव ०१, परजिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे़ तसेच आजपर्यंत ५ लाख ४९ हजार ३८६ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.११० रुग्णांवर उपचार सुरू
आज रोजी ११५२ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८६ हजार २९३ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ८५ हजार ५२९ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ११० कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ६५४ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.