शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

Corona Cases in Buldhana :  मंगळवारी ६ जणांचा मृत्यू, ८०४ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 10:07 AM

Corona Cases in Buldhana: सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ८०४ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनामुळे मंगळवारी बुलडाणा जिल्ह्यात सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ८०४ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ६,८९१ अहवाल मंगळवारी प्राप्त झाले होते. त्यापैकी ६०८७ अहवाल निगेटीव्ह आले होते.कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात १०५, खामगाव तालुक्यात ६२, शेगावमध्ये ५, देऊळगाव राजा ८७, चिखली ८०, मेहकर १४६, मलकापूर ३८, नांदुरा ६४, लोणार २७, मोताळा ६९, जळगाव जामोद ३३, सि. राजा ७०, संग्रामपूर तालुक्यातील १८ जणांचा समावेश आहे. उपचारादरम्यान खामगाव तालुक्यातील सुटाळा येथील ६० वर्षीय व्यक्ती, चिखली तालुक्यातील किन्होळा येथील ४२ वर्षीय महिला, बुलडाणा तालुक्यातील तांदुळवाडी येथील ४० वर्षीय पुरुष आणि दुधा येथील ५५ वर्षीय महिला तसेच बुडाणा शहरातील ५३ वर्षीय महिला आणि शिवाजीनगर भागातील ६१ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.दुसरीकडे ९०३ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ४ लाख २५ हजार ३०३ संदिग्धांचे अहवालही निगेटिव्ह आलले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या