लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा आलेख घसरला असून साेमवारी ५०९ जणांनी काेराेनावर मात केली आहे़ काेराेना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी मृत्यूची संख्या कायम असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे़ . आणखी ९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ४२७ जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे़. तसेच २ हजार ९७४ काेराेना अहवाल निगेटीव्ह आले आहेत़.उपचारादरम्यान जळकी ता. सिल्लोड जि. औरंगाबाद येथील ५५ वर्षीय महिला, चिखली येथील ५० वर्षीय महिला, जय अंबे नगर शेगाव येथील ६१ वर्षीय पुरुष, माळवंडी ता.बुलडाणा येथील ४० वर्षीय महिला, धाड ता. बुलडाणा येथील ६० वर्षीय महिला, पि. देशमुख ता. खामगांव येथील ७० वर्षीय पुरुष, आंबे टाकळी ता. खामगांव येथील ८५ वर्षीय महिला, इकबाल चौक बुलडाणा येथील ४३ वर्षीय पुरुष, चिखली येथील ५५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.पाॅझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील ३८, बुलडाणा तालुका हतेडी ४, पाडळी ३, सुंदरखेड २, कोलवड ३, दुधा ३, दहीद ४, खूपगाव २, येळगाव २, मोताळा शहर २, मोताळा तालुका पि. नाथ २, बोरखेडी २, खामगांव शहर१५, खामगांव तालुका पारखेड १, जनुना १, शेगाव शहर ६, शेगांव तालुका माटर गाव २, भोनगाव १, चिखली शहर ९, चिखली तालुका अंचरवाडी १, लोणी लव्हाळा १, धोत्रा १, दहिगाव १, किन्होळा १, धोडप १, बेराळा दे. राजा शहर ३४, दे. राजा तालुका अंभोरा ४, पिंपळगाव ४, सातेगाव ४, पांगरी २, सावखेड भोई २, सिनगाव जहा १०, जांभोरा २, कुंभारी २, , मेंडगाव २, आळंद २, उंबरखेड २, उमरज २, शिराळा ३, जवळखेड ६, सिं. राजा शहर ५, सिं. राजा तालुका शिवणी टाका १, वाघाळा १, वडाळी १, साखरखेर्डा ४, दुसरबिड २, सवडत २, लिंगा २, नशिराबाद २, मेहकर शहर ३, मेहकर तालुका जानेफळ १, कल्याणा १, जाऊळका १, आंध्रुड ३, वर्दाडी १, नागापूर २, संग्रामपूर तालुका उमरा १, पळशी ४, अकोली २, सोनाळा ३, पिंगळी १४, टूनकी १०, एकलारा २, लाडणापुर १९, बावन बिर ३, आलेवाडी २, जळगांव जामोद शहर ७, जळगांव जामोद तालुका सुनगांव ३, काजेगाव ४, चावरा २, वडगाव गड ३ नांदुरा शहर ५, नांदुरा तालुका महाळूंगी १, वसाडी २, लोणार शहर २, सुलतानपूर येथील एकाचा समावेश आहे.
Corona Cases in Buldhana : ९ जणांचा मृत्यू, ४२७ नवे पाॅझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 11:16 AM