लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कठोर निर्बंधांच्या काळातही कोरोना संक्रमणाची व्याप्ती वाढत असून शुक्रवारी ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर १२२८ जण कोरोना बाधित झाले. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ६२६० जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये बुलडाणा तालुक्यात १८६, खामगाव ९७, शेगाव ११७, दे. राजा ११६, चिखली १०८, मेहकर १०७, मलकापूर ७८, नांदुरा १३३, लोणार ९१, मोताळा ४६, जळगाव जामोद ६७, सि. राजा ५६, संग्रामपूरातील २६ जणांचा समावेश आहे. उपचारादरम्यान खामगाव तालुक्यातील गेरू येथील ५५ वर्षीय महिला, खामगावातील शेलगाव नाका येथील ५० वर्षीय महिला, उंबरा येथील ५५ वर्षीय महिला, सरंबा येथील ८० वर्षीय महिला, मेहकरमधील ४५ वर्षीय पुरुष, हिवरा आश्रम येथील ५८ वर्षीय महिला, बुलाडण्यातील ८१ वर्षीय पुरूष आणि ५५ वर्षीय महिला, चिखलीमधील ५६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शुक्रवारी ५८९ जणांनी कोरोनावर मात केली.
Corona Cases in Buldhana : ९ जणांचा मृत्यू, १२२८ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 11:22 AM