लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनामुळे रविवारी जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून ३४ जण तपासणीत कोरोनाबाधित आढळून आले आहेत. चार महिन्यांतील कोरोनाबाधितांची ही नीचांकी संख्या आहे. दरम्यान, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ३ हजार ६१६ जणांचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यापैकी ३ हजार ५८२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा तालुक्यातील तीन, शेगाव तालुक्यात दोन, देऊळगाव राजा दोन, चिखली एक, मेहकर एक, मलकापूर एक, नांदुरा दोन, लोणार एक, मोताळा तीन, जळगाव जामोद एक, सिंदखेड राजा सात आणि संग्रामपूर तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे. दरम्यान, खामगाव तालुक्यात तपासणीमध्ये एकही जण कोरोनाबाधित आढळून आला नाही. उपचारादरम्यान चिखली येथील ५५ वर्षीय महिला, मोताळा तालुक्यातील शिरवा येथील ३८ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे रविवारी १९७ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत तपासणी केलेल्या संदिग्ध रुग्णांपैकी ५ लाख ४ हजार ४२० संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर ८३ हजार ९२० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
Corona Cases in Buldhana : दोघांचा मृत्यू, ३४ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2021 11:35 AM