शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

Corona Cases in Buldhana : चार महिन्यात बाधितांचा आकडा प्रथमच शंभराखाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 11:31 AM

Corona Cases in Buldhana: जानेवारी महिन्यानंतर प्रथमच जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दोन अंकी संख्येत आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनामुळे जिल्ह्यात शनिवारी तीन जणांचा मृत्यू झाला असून, जानेवारी महिन्यानंतर प्रथमच जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दोन अंकी संख्येत आला आहे. दरम्यान शनिवारी ८०जण तपासणीत कोरोनाबाधित आढळून आले आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण ४१४० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४,०६४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यात दहा, खामगाव एक, शेगाव चार, देऊळगाव राजा १३, चिखली सात, मेहकर आठ, मलकापूर १६, नांदुरा एक, लोणार चार, मोताळा दोन, जळगाव जामोद सहा, सिंदखेड राजा दोन आणि संग्रामपूर तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे. उपचारादरम्यान चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथील ७० वर्षीय महिला, बुलडाणा येथील ७१ वर्षीय महिला आणि मलकापूर तालुक्यातील उमाळी येथील ४६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शनिवारी १३९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ५ लाख ८३८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर ८३ हजार ७२३ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

११३६ सक्रिय रुग्णजिल्ह्यात सध्या ११३६ सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८५ हजार ४८८ एवढी आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात ६२९ जणांचा मृत्यू झाला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या