लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनामुळे शनिवारी जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला तर ५९२ जण तपासणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी ४ हजार ४३२ संदिग्धां्या अहवालापैकी ३ हजार ८४० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा तालुक्यात ९८, खामगाव ४९, शेगाव ९०, देऊळगाव राजा २४, चिखली ३८, मेहकर ९, मलकापूर ५३, नांदुरा ४६, लोणार २७, मोताळा ४१, जळगाव जामोद ५९, सिंदखेड राजा ४८ आणि संग्रमापूर तालुक्यात १० जणांचा समावेश आहे. दुसरीकडे उपचारादरम्यान संग्रामपूर तालुक्यातील वझर्डा येथील ५५ वर्षीय व्यक्ती, खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रूक येथील ७५ वर्षीय महिला, शिरला नेमाने येथील २५ वर्षीय व्यक्ती आमि शेगाव येथील एसबीआय कॉलनीमधील ६० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.दरम्यान ८२४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तपासणीसाठी पाठविलेल्या संदिग्धांच्या अहवालांपैक ४ लाख ४४ हजार ३९८ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर ७६ हजार २०३ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. दरम्यान जिल्ह्याचा मृत्यूदर ०.६७ टक्केवर सध्या स्थिरावलेला असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.
Corona Cases in Buldhana : चौघांचा मृत्यू, ५९२ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 11:23 AM