लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असून, शनिवारी तपासणीमध्ये ३९ जण कोरोना बाधित आढळून आले. दरम्यान, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या एकूण ३ हजार २५९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३ हजार २२० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात दहा, खामगाव पाच, शेगाव दोन, देऊळगाव राजा चार, चिखली चार, मेहकर एक, मलकापूर पाच, लोणार तीन, मोताळा एक, जळगाव जामोद दोन, सिंदखेड राजा आणि संग्रामपूर तालुक्यात प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे. तपासणीमध्ये नांदुरा तालुक्यात एकही जण कोरोना बाधित सापडला नाही. तसेच गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.दुसरीकडे शनिवारी ४६ जणांनी कोरोनावर मात केली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ५ लाख ४५ हजार ७९५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर ८५ हजार ४६५ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. सध्या बाधितांची संख्या घटली आहे.
Corona Cases in Buldhana : दोन दिवसापासून जिल्ह्यात एकही मृत्यू नाही; ३९ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 12:47 PM