लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनामुळे जिल्ह्यात बुधवारी दहा जणांचा मृत्यू झाला असून, ६७४ जण तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. प्राप्त ६ हजार ६०० अहवालांपैकी. ५ हजार ९२६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.उपचारादरम्यान डिघी येथील ८० वर्षीय व्यक्ती, सातगाव म्हसला येथील ६८ वर्षीय पुरुष, मोताळा येथील ४० वर्षीय व्यक्ती, हिंगोली येथील ६३ वर्षीय व्यक्ती, खामगावातील ६८ वर्षीय व्यक्ती, महाळुंगी येथील ३३ वर्षीय महिला, नांद्राकोळी येथील ६८ वर्षीय पुरुष, बावनबीर येथील ५० वर्षीय पुरुष, मेहकर शहरातील वॉर्ड क्रमांक एकमधील ६५ वर्षीय महिला, चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथील ६९ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
Corona Cases in Buldhana : दहा जणांचा मृत्यू, ६७४ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 11:36 AM