पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा शहरातील ३७, सुंदरखेड येथील एक, गिरडा येथील एक, दहीद येथील एक, चांडोळ येथील एक, हिवरा येथील एक, अमडापूर येथील एक, धोत्रा भणगोजी येथील एक, हातणी येथील एक, चिखली येथील ११, देऊळगाव राजा एक, सिनगाव जहागीर दोन, देऊळगाव मही एक, लोणार चार, सिंदखेड राजा दोन, रुम्हणा एक, शेंदुर्जन एक, मेहकर शहर चार, गुंधा एक, मुंदेफळ एक, डोणगाव दोन, नांदुरा एक, झाडेगाव एक आणि अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर येथील एक, जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील दोन जणांचा बाधितांमध्ये समावेश आहे. असा प्रकारे ८२ जण मंगळवारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दुसरीकडे उपचारादरम्यान मेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे आतापर्यंत ७६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये बुलडाणा कोविड केअर सेंटरमधून १४, खामगावमधून नऊ, देऊळगाव राजामधून १७, सिंदखेड राजामधून तीन, चिखली मधून नऊ, शेगावमधून पाच, मलकापूर तीन, लोणार सहा, जळगाव जामोद मधून एक, मेहकरमधून आठ जणांना सुटी देण्यात आली आहे.
यासोबतच जिल्ह्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी १ लाख १५ हजार ९५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच १४ हजार २२१ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
१०६७ अहवालाची प्रतीक्षा
तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या १०६७ संदिग्धांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १५०२६ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ६२७ सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात आतापर्यंत १७८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.