गुरुवारी बुलडाणा तालुक्यातील १५१ जण कोरोनाबाधीत आढळून आले तर चिखली तालुक्यात हा आकडा १५७ असा सर्वाधिक आहे. खामगाव तालुक्यात ५३, शेगाव तालुक्यात २४, देऊळगाव राजा तालुक्यात २९, मेहकर तालुक्यात ३७, मलकापूर तालुक्यात ३०, नांदुरा तालुक्यात ५२, लोणार तालुक्यात ५८, मोताळा तालुक्यात ३९, जळगाव जामोद तालुक्यात ३५, सिंदखेड राजा तालुक्यात ५५ आणि संग्रामपूर तालुक्यात १४ जण कोरोनाबाधित आढळून आले. गुरुवारी असे एकूण ७३४ जण तपासणीत कोरोनाबाधित आढळून आले. गुरुवारी एकूण ३ हजार ६७८ संदिग्धांच्या अहवालाची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी २,८८७ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
दुसरीकडे गुरुवारी ७९१ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ४२ हजार ९१३ झाली आहे. अद्यापही ४ हजार ४४७ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ३ लाख ३१ हजार ३३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.