लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरातील कोरोना लागण झालेल्या व्यक्तीची माहिती देण्यासाठी, कोरोना संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी बुलडाणा नगर परिषद कार्यालयात कोरोना आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा संपर्क क्रमांक ९६२३८१७७६० आहे.शहरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुलडाणा नगर परिषदेच्यावतीने शहरात विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याअतंर्गत शहरात स्वच्छतेची मोहिम राबविण्यात येत असून सार्वजनिक ठिकाणी कुणीही कचरा, घाण न करणे तसेच रस्त्यावर कुणीही थुंकू नये याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.शहरातील अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या किराणा दुकान तसेच मेडीकल स्टोअर येथे नागरिकांची गर्दी होत असल्याने ग्राहकामध्ये सुरक्षीत अंतर ठेवण्यासाठी नगर परिषदेकडून अत्यावश्यक सेवा देणाºया दुकानासमोर पेंटने किमान एक मीटर अंतरावर चौकोन, वर्तुळ आखण्यात आलेली आहे. नागरिकांनी एकमेकातील सुरक्षीत अंतर ठेवूनच दुकानावर आवश्यक ती खरेदी करावी. जेणेकरून कोरोना विषाणू संसर्ग रोखता येईल, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बाहेर गावावरून येणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहनशहरात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषदेच्यावतीने करण्यात येणाºया उपाय योजनास शहरातील नागरिकांनी नगर परिषदेस सहकार्य करावे. शहरात परदेशातून, मुंबई, पुणे आदी बाहेर गावावरून येणाºया नागरिकांची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षास द्यावी, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.
कोरोना: बुलडाणा पालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 10:54 AM