--पालिकेची नऊ पथके कार्यरत--
१) कडक निर्बंध शिथिल झाल्यानंतर कोरोनाच्या प्रतिबंधासाठीचे नियम पाळल्या जातात की नाही, यासाठी आधीपासूनच गठित गेलेल्या पालिकेच्या नऊ पथकाद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.
२) प्रत्येक पथकामध्ये पालिका आणि पोलीस दलातील कर्मचारी आहेत. त्यामुळे कोरोना संपला अशा आविर्भावात असलेल्यांना प्रसंगी फटका बसू शकतो.
३) गठित करण्यात आलेल्या या नऊ ही पथकांना शहरात विविध भागांत तैनात करण्यात आलेले आहे.
४) त्यामुळे प्रशासनाने केलेल्या सूचनांचे सर्वांनी आवर्जून पालन करणे गरजेचे आहे.
--त्रिसूत्रीचे पालन आवश्यक--
कोरोना प्रतिबंधासाठी शारीरिक अंतर पाळणे, मास्क लावणे आणि नियमित हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्यासाठी नागरिकांनी ती सवयच लावून गेणे आवश्यक आहे. कोरोनाला कडक निर्बंधामुळे पायबंद घालण्यात काही प्रमाणात यश आले असले तरी तो पुन्हा डोके वर काढू शकतो. पहिली पेक्षा दुसरी लाट अधिक तीव्र होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेबाबत दक्षता हेच प्रमुख अस्त्र आहे. त्याचे काटेकोर पालन केल्यास तिसऱ्या लाटेतील संभाव्य मोठे नुकसान आपण टाळू शकतो, असे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. जे. सांगळे यांनी सांगितले.
अ) निर्बंध शिथिल झाल्यानंतर बेफिकीर झालेल्यांनी बाजारात मोठी गर्दी केली. यातून अनेकांनी कोरोना घरी नेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
ब) कोरोना प्रतिबंधासाठीच्या त्रिसूत्रीचे पालन होत नाही. अनेकांचा मास्क हा हनुवटीवर असतो. गर्दीची ठिकाणे टाळण्याच्या सूचना आहेत. पण त्याकडे लक्ष दिले गेले नाही.
क) कोरोनाबाधितांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग सुरूच ठेवून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करणे आवश्यक. गृहविलगीकरणातील अनेकांना बाहेर फिरून कोरोनाचे संक्रमण वाढवले.
ड) जानेवारीत जिल्ह्यात झालेल्या ५२३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचाही हातभार ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढण्यास झाला. प्रचार सभा, बैठका व गर्दीमुळे संक्रमणास हातभार लागल्याचे दिसून आले.
इ) पहिल्या लाटेत कौटुंबिकस्तरावर काळजी घेण्यात आली. लक्षणे दिसल्यानंतर चाचण्याही केल्या. दुसऱ्या लाटेदरम्यान केवळ गृहविलगीकरणावर भर दिल्याने रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढले. त्यातून मृत्युदर वाढला.
--अनलॉक--
पहिला
५ जून २०२०
एकूण कोरोना रुग्ण : ८२
मृत्यू : ३
आताचा
१ जून २०२१
एकूण कोरोना रुग्ण : ८४,९०६
मृत्यू : ६०९