पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील ९८, खामगावमधील ७६, शेगाव ३८, देऊळगाव राजा ५९, चिखली ६३, मेहकर १४८, मलकापूर २१, नांदुरा ४३, लोणार ३४, मोताळा ९, जळगाव जामोद ४३, सिंदखेड राजा ४३ आणि संग्रामपूर तालुक्यातील ८ जणांचा समावेश आहे. उपचारादरम्यान नांदुरा तालुक्यातील डिघी येथील ८० वर्षीय व्यक्ती, बुलडाणा तालुक्यातील सातगाव म्हसला येथील ६८ वर्षीय पुरुष, मोताळा येथील ४० वर्षीय व्यक्ती, हिंगोली येथील ६३ वर्षीय व्यक्ती, खामगाव शहरातील सिव्हिल लाइन भागातील ६८ वर्षीय व्यक्ती, नांदुरा तालुक्यातील महाळुंगी येथील ३३ वर्षीय महिला, बुलडाणा तालुक्यातील नांद्राकोळी येथील ६८ वर्षीय पुरुष, संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील ५० वर्षीय पुरुष, मेहकर शहरातील वॉर्ड क्रमांक एकमधील ६५ वर्षीय महिला, चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथील ६९ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
दुसरीकडे ५६३ जणांनी बुधवारी कोरोनावर मात केली. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ४ लाख ३१ हजार २२९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर आजपर्यंत ७३ हजार ९०९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
--३०८९ अहवालाची प्रतीक्षा--
बुधवारी जिल्ह्यातील ३ हजार ८९ संदिग्धांचे अहवाल तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७९ हजार ९४४ झाली आहे. यापैकी ५ हजार ५०३ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे ५३२ जणांचा मृत्यू झाला आहे.